Breaking News

वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन


पाथर्डी भारतीय जनता पार्टी युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन 26 एप्रिल रोजी करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित मौज मजेला फाटा देत आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून वाफट खर्चाला फाटा देत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

यामध्ये भव्य सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन तालुक्यातील येळी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गुरुवार दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात सर्व प्रकारच्या तपासण्या तज्ञ डॉक्टरांकडून केल्या जाणार आहे . त्याचप्रमाणे आवश्यक त्या गोळ्या मोफत उपल्बध करण्यात आल्या आहेत . येळी आणि पंचकृषीतील ग्रामस्थांनी आरोग्य तपासणीचा अवश्य लाभ घ्यावा तसेच तालुक्यात विविध ठिकाणी स्री जन्माचे स्वागत, वृक्षारोपन, रक्तदान शिबीर, गरजू विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.