Breaking News

पूजा सकटच्या मृत्यूची चौकशी करा.


महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारताला हादरवणारी घटना अवघ्या 3 महिन्यांपूर्वी घडली. ती म्हणजे पूणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथील दंगल प्रकरण वा हिंसाचार प्रकरण 1 जानेवारी भिमा कोरेगाव येथे बहूजन समाज तथा भिम अनुयायांवर भ्याड हल्ला झाला. त्यामध्ये सकट कुटूंबियाचे घर जाळले. सदर घटनेची महत्वाची साक्षीदार पूजा सकट (वय 17 वर्षे) ही युवती होय. याच पूजा सकटचा संशयास्पद मृत्यू कसा झाला? कोणी तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले? याची सखोल चौकशी करण्याची मागणी उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे लहूसंग्राम प्रतिष्ठाणचे संस्थापक सागर साळवे यांनी केली आहे. त्याचबरोबर पूजा सकट हिस विहीरीत उडी मारण्यास भाग पाडणार्‍या-आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या संशयित लोकांची सखोल चौकशी करून, त्यांना कठोर शासन करण्याची मागणी देखील निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी लहूसंग्राम प्रतिष्ठाणचे संस्थापक सागर साळवे, वरूण वाघमारे, आकाश साबळे, ऋषि उकिरडे, आकाश लोखंडे, नितीन साठे, सागर गायकवाड, रोहित शिंदे, राकेश जगधने, पवन वाघमारे, शुभम साठे यांसह आदी उपस्थित होते