Breaking News

गुंगीचे औषध टाकून महिलेवर अत्याचार

पारनेर तालुक्यातील कोहकडी येथील 28 वर्षीय विवाहित महिलेवर गेल्या 7 महिन्यापासून शिरुर येथील लॉजवर व राहत्या घरी बळजबरीने बलात्कार केला असल्याची फिर्याद पारनेर पोलिस ठाण्यात पिडीत महिलेने दिली आहे.

याबाबद पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, या घटनेतील आरोपी मच्छिंद्र जाधव याने गेल्या वर्षी ऑक्टोबर 2017 मध्ये तुझ्या पतीचा शिरुर बायपास येथे अपघात झाल्याचेे फोनवर खोटे सांगून शिरुर येथे महिलेस बोलावून घेतले. त्यावेळी चहा पिण्याच्या सहाय्याने महिलेच्या चहामध्ये गुंगीचे औषध टाकून पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील हॉटेल जान्हवी लॉजवर नेवून तेथे महिलेचे विवस्त्र फोटो काढले. तसेच शिरुर येथील हॉटेल जान्हवी लॉजिंग व राहत्या घरी या दोन्ही ठिकाणी महिलेस ऑक्टोबर 2017 ते 23 एप्रिल 2018 या सात महिन्यांच्या कालावधीत महिलेच्या इच्छेविरोधात आरोपींने बळजबरीने शरीर संभोग केला असल्याची फिर्याद या महिलेने दिली आहे. तसेच या संदर्भात कुठेही वाच्यता केल्यास तुझे विवस्त्र व अश्‍लील फोटो तुझ्या घरच्यांना दाखविल अशी धमकी देवून अनेक वेळा बलात्कार केला असल्याची फिर्याद या पिडीत महिलेने दिली आहे. त्यानुसार या पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून मच्छिंद्र जाधव याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असुन पोलिस त्याचा शोध घेत आहे.