Breaking News

अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठाणतर्फे स्वखर्चातून एलईडी दिवे


पाथर्डी (प्रतिनिधी) - शहरातील प्रभाग 6 मध्ये अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानतर्फे नगरसेवक प्रसाद आव्हाड यांनी आपल्या प्रभागात एलईडी बसवुन अंधारामय असलेला भाग एलईडी दिवे बसवून प्रकाशाच्या झोतात आणला आहे. एलईडी बसल्यानंतर उपस्थित प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक प्रसाद आव्हाड यांच्या कामाबद्दल आनंद व्यक्त केला. तर अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठणचे काम खूपच चांगले असल्याचे यावेळी मत मांडले.शहरातील अनेक भाग एलईडी पथदिव्यांनी उजळलेले असताना बहुतांशी भाग हे अंधारात असुन काही भाग जुन्या सीएफएल पथदिव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशातच आहेत. पाथर्डी नगरपालिकेचे बहुचर्चित एलईडी पथदिव्यांचे काम हे जुन्या कार्यकाळात प्रस्तावित असल्याने तसेच त्यात कधीही पथदिवे नसलेल्या भागांचा प्राधान्याने विचार झाल्याने आणि नजीकच्या काळात पाथर्डी नगरपरिषदेतर्फे नवीन एलईडी पथदिव्यांच्या कामाला विलंब होणार असल्याने वंचित भागातील नागरिकांच्या अडचणी जाणून अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठाण तर्फे स्वखर्चातून साईनाथनगर तसेच भगवान नगर उद्यान परिसरात एलईडी दिवे बसवण्यात आले. यावेळी टप्प्याटप्प्याने सर्व प्रभाग प्रकाशमय करण्याचा मानस असल्याचे नगरसेवक प्रसाद आव्हाड यांनी बोलून दाखवले. पाथर्डी नगरपरिषदेच्या विद्युतीकरण विभागाचे संजय बोरुडे, बाळू सरोदे, शेकडे आदींनी रणरणत्या उन्हात सुट्टीच्या दिवशी काम करत सहकार्य केल्याने प्रसाद आव्हाड यांनी त्यांचे यावेळी आभार मानले.