Breaking News

जिल्हा मराठा हॉटेल मॅनेजमेंटच्या चार विद्यार्थ्यांना अमेरिकेत जॉब प्लेसमेंट


नगर । प्रतिनिधी - अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या पाच विद्यार्थ्यांना अमेरिकेत जॉब प्लेसमेंट मिळाली. या पाच विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, संचालक डॉ. एन. आर. जगताप, सहसचिव अ‍ॅड. विश्वास आठरे पाटील, प्राचार्य योगिता सद्रे, प्रा. बाळासाहेब शेंडगे उपस्थित होते. अमेरिकेतील हॉटेल वेस्टीन हिल्टन रिसॉर्ट अ‍ॅण्ड स्पामध्ये शुबेंदू होर्ने, अनुज पावले, मनोज राठोड तर तर ग्रॅण्ड जिनेव्हा रिसॉर्ट अ‍ॅण्ड स्पा या हॉटेलात सुमित पवार व सागर झवेरी यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. या दोन्ही हॉटेलच्या मुलाखतीच्या वेगवेगळ्या फेर्‍यांमधून या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.