Breaking News

अधिकाऱ्याचा बेसमेंटमध्ये पडून मृत्यू


आयएनए येथील दिल्ली विकास प्राधिकरण (डीडीए) मुख्यालयात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावरून पडून डीडीएच्या सेक्शन अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यालयात बांधकाम सुरू असलेल्या पायातून अधिकाऱ्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी भादंवि ३०४ अ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिस या कामाचे कंत्राट ज्या व्यक्तीस दिले आहे, त्याचा शोध घेत आहेत.