भारताच्या शेजारी असलेले राष्ट्र म्हणून चीनचा उल्लेख करण्यात येतो. मात्र चीन हा देश विश्वासपात्र नाही, म्हणून सातत्याने ओरड होत होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात दोन दिवशीय परिषद घेण्यात आली, त्यातील सुर हा दोन्ही देशांना जवळ आणणारा आहे. चीनची सातत्याने भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होता. तर भारताकडून नेहमीच शांततेचे धोरण अवलंबण्यात आले. त्याचाच परिपाक म्हणून चीनने लवचिक भूमिका घेत भारताचा एकप्रकारे सन्मानच केला आहे. मात्र चीनची ही भूमिका कायम अशीच राहते, का? हे येणार्या काही दिवसांत स्पष्ट होईलच. भारत, चीन आणि अफगाणिस्तान मिळून एक अर्थविषयक प्रकल्प संयुक्तरित्या राबविणार आहेत. हा एक प्रकारे पाकिस्तानाला चीनने दिलेला शह असल्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणात मानले जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी हा प्रकल्प अफगाणिस्तानात राबविण्यास संमती दिली आहे. तसेच भविष्यात कोणत्याही तिसर्या राष्ट्राला कसल्याही प्रकरची मदतीची गरज असल्यास भारत आणि चीन त्यांना सहकार्य करणार आहे. यावरून भारतांचे जागतिक स्तरावरील दबदबा वाढत चालल्याचे हे द्योतक आहे. भारताची अवस्था 1962 सारखी राहीलेली नाही. भारत प्रगत तंत्रज्ञानात आणि शस्त्रासह सज्ज देश आहे, हे चीनला चांगलेच ठाऊक आहे. तरीही चीनकडून भारताची राजनैतिक कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. चीनच्या प्रसारमाध्यमांनी भारत आणि चीनचे संबध आणखी ताणले जातील याची पुरेपूर दक्षता घेण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या चीनभेटीमुळे, राजनैतिक संबध सुधारणार यात शंकाच नाही. चीनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजशिष्टाचारानुसार केलेला सत्कार सर्वच काही डोळे दिपवून टाकणारे होते. असे असले तरी, भारताचे शेजारी राष्ट्र असलेले चीनची भूमिका नेहमीच संशयातीत रा हिली आहे. चीनने भारतासोबत शेजारधर्म निभवतांना नेहमीच संशयित भूमिका ठेवली आहे. त्यामुळे चीनप्रती भारताने कधीही गाफील राहू नये, म्हूणन भारताने आपल्या परराष्ट्रीय धोरणात बदल केला. चीनच्या महासत्तेला सुरूंग लावण्याची क्षमता भारतामध्ये आहे, हे एव्हाना चीनला कळून चुकले आहे. भारताची आर्थिक क्षेत्राची घौडदौड ही वेगांने होतांना दिसून येत आहे. तसेच चीनच्या इतर देशांसोबत असलेली विंतडवादाच्या भूमिकेमुळे चीनला मित्र देखील मिळू शकत नाही. याउलट भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरांवर विविध देशांसोबत संवाद साधत विकसावर भर देण्याची क्रिया अनेक देशांना सुखावून गेली आहे. भारताची होणारी प्रगती चीनच्या डोळया नेहमीच खुपत राहिली आहे. त्यामुळे भारताच्या विकासाच्या मार्गात अडचणी कशा आणता येईल, भारत अशांत कसा राहील यासाठी चीनकडून वेळोवेळी पाकला रसद पुरविण्याचे काम देखील केले आहे. मात्र आता दोन्ही देश विकासात्मक आणि रचनात्मक बदलासाठी पुढे येत आहे, ही नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाची बाब आहे.
अग्रलेख - भारत-चीनची वाढती जवळीक!
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:33
Rating: 5