हरणाच्या कळपातील हरवलेल्या पडसास शेतकर्याकडुन जिवदान
भटक्या कुत्रांनी घेरावा घातलेल्या हरणाच्या कळपातील हरवलेल्या पडसास शेतकर्याकडुन जिवदान दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील वळण येथे अक्षयतृतीयाच्या दिवशी घडली आहे. मात्र राहुरीच्या वन विभागाच्या अधिकारयांना माहिती देवुनही वेळेवर न आल्याने वन विभागाची निषक्रीयता चव्हाट्यावर आली आहे.आज अक्षयतृतीयाच्या या दिवशी जलदानाचे महत्त्व सांगितले आहे. जलदान, वृक्षसंवर्धन आणि मुक्या प्राणांना जीवनदान दिल्यास अनेक दोष नष्ट होतात व पुण्य लाभते असे पोथी पुरणात म्हटले आहे. वळण येथिल शेतकरी बाबासाहेब संपत आढाव यांच्या शेतात काल सायंकाळी हरणाचे कळप दिसुन आले होते. आज दि १८ ऐप्रिल रोजी सकाळी शेतकरी आढाव यांच्या घासामधे काही भटके कुत्रे कळपातुन हरवलेल्या हरणाच्या पडसाची छेड काढत पंजे मारत होते यावेळी बाबासाहेब आढाव यांचे लक्ष गेल्याने त्यांनी भटक्या कुत्र्यांना हकलुन लावत या घाबरलेल्या पडसास धीर देत आपल्या जनावरांच्या शेडमधे नेवुन पाणी पाजुन या पडसास जिवदान व सायंकाळी मव विभागाचे कर्मचारी यांच्याकडे ते पाडस सुतूर्प केले पुढील संगोपनासाठी हे पाडस आरण्यात सोडण्यात येईल असे वन विभाच्या कर्मचारांनी सांगितले