गोदावरी स्वच्छता अभियानास प्रारंभ
कोपरगांवः तालुक्यातील संवत्सर येथील पावन हनुमान मित्र मंडळाच्यावतींने गोदावरी नदी पात्र साफ सफाई स्वच्छता अभियानास सुरूवात करण्यांत आली असून मंडळाचे यंदाचे हे पाचवे वर्श आहे. संवत्सर आणि कोकमठाण या दोन गावादरम्यान ऐतिहासिक गोफणधोंडा युध्द खेळले जाते पण ते दोन्ही गांवच्या ग्रामस्थांनी एकत्रीत ठराव करून ते बंद केले. अक्षयतृतीयेपासून या युध्दास सुरूवात व्हायची संवत्सर येथील पावन हनुमान मित्र मंडळ गेल्या पाच वर्शापासून त्याची आठवण म्हणून नदी पात्र स्वच्छ करत असते. गोदावरी नदीपात्रात विविध देव देवतांचे जीर्ण झालेले फोटो, काटेरी फास, गोधडया, जुने कपडे अंत्यविधी तसेच दषक्रियाविधी झाल्यानंतर उरणांरा व टाकला जाणांरा कचरा, प्लॅस्टीकच्या बाटल्या, गणपती विर्सजनप्रसंगी टाकण्यांत आलेल्या विविध मुत्र्या त्यासाठी वापरला जाणांरा काथ्या, मुर्ती मंदिर सजावटीसाठी वापरले जाणांरे थर्मोकोल विविध हार आदि तत्सम साहित्य जमा करून हा सगळा कचरा जाळून नश्ट केला जातो. या अभियानाची सुरूवात पावन हनुमान मित्र मंडळांने 2013 पासून केली आहे. यात विविध समााजिक कार्यकर्ते व मंडळाचे सर्व सदस्य लहान मुले सहभागी होवुन संवत्सर गोदापात्रातील सर्व केरकचरा एका ठिकाणी गोळा करून तो दरवर्शी उन्हाळयाच्या सुटटी जाळून टाकतात. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे अन्य गावांतील मंडळींनी स्वागत करून त्याप्रमाणे स्वच्छतेचे अभियानही अन्यत्र सुरू केले आहे. पावन हनुमान मंडळ दरवर्शी हनुमान जयंतीबरोबरच विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करते.