नक्षलवाद्यांच्या रडारवर अनुसूचित जमाती कल्याण समितीतील आमदार
अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या आमदारांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवादी येणार होते, अशी गुप्त माहिती पोलिसांना होती. याच भामरागड नक्षली भागाच्या दौऱ्यात ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभेचे आमदार पांडुरंग बरोरा, नगर जिल्ह्यातील अकोले विधानसभेचे आमदार वैभव पिचड, पालघर येथील विधानपरिषद आमदार आनंद ठाकूर, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे आणि पालघर जिल्ह्यात डहाणू विधानसभेचे आमदार अमित घोडा हे होते.या परिसरात वाहनाने जाण्यासाठी आमदारांच्या समिती सदस्यांना पोलीसांनी मनाई केली होती. मात्र, या परिसरातील आदिवासींचे जीवनमान, त्यांना मिळणाऱ्या शासकीय योजना यांची पाहणी करण्यासाठी समिती सदस्यांनी आग्रह धरला.
