हैदराबाद- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी सीताराम येचुरी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. हैदराबाद येथे सुरू असलेल्या पक्षाच्या 22 व्या अधिवेशनात येचुरी यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांच्या तीन वर्षांचा कार्यकाळ नुकताच संपला होता. माकप नेते प्रकाश कारत यांचा गट दुसर्या नावासाठी आग्रही होता. त्यामुळे येचुरी यांच्या फेरनिवडीवर शंका उपस्थित केली जात होती. पक्षाच्या पॉलीट ब्युरोच्या आज झालेल्या बैठकीत येचुरी यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. सीताराम येचुरी आणि प्रकाश कारत दोघेही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तुल्यबळ नेते मानले जातात. आगामी निवडणुकीत पक्षाने घ्यावयाच्या राजकीय भूमिकेवरून वाद उद्भभवला होता.
सीताराम येचुरी यांची माकपच्या सरचिटणीसपदी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:59
Rating: 5