Breaking News

आदिवासी बांधवांना गॅस वाटप हाच ‘उज्वलादिन’ : माळी


कोपरगांव ता. प्रतिनिधी - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्र्यरेषेखालील महिलांचा ख-या अर्थाने सन्मान करण्यासाठी विना अनामत उज्वला गॅस योजना प्रत्यक्षात आणली. या योजनेंतर्गत अनुसुचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांना गॅसचे वितरण करून खऱ्या अर्थाने ‘उज्वलादिन’ साजरा करण्यात आला, असे प्रतिपादन संजीवनी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कैलास माळी यांनी केले.

आदिवासी बांधवांना गॅस वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोपरगांव गॅस कंपनीचे संचालक अविनाश सातपुते म्हणाले, ग्रामीण भागात धामोरी येथे उज्वलादिनाची आठवण म्हणून दारिद्रयरेषेखाली लाभार्थ्यांना गॅसचे वितरण होत आहे, हा आनंदाचा क्षण आहे. प्रारंभी व्यवस्थापक लक्ष्मण निसमे सांनी गॅस सुरक्षितता व त्याचा वापर याबाबत माहिती दिली. याप्रसंगी माजी उपसभापती वैशाली साळुंके, मायगांवदेवीचे सरपंच बिजला साबळे, मोहन माळी, वसंत माळी, बाजीराव मांजरे, मोर्वीस, चासनळी, मंजुर, मायगांव देवी येथील महिला लाभार्थी उपस्थित होते. डाॅ वाणी यांनी प्रास्तविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोपरगांव गॅस कंपनीचे सर्वश्री शाम गोसावी, सिध्दार्थ भुसारे, शिवाजी घुले आदींनी विशेष परिश्रम घेतले. अविनाश सातपुते यांनी आभार मानले.