Breaking News

पाणी फाऊंडेशन वाटर कप स्पर्धा गोंदर्डी गावाने केला पहिला टप्पा पुर्ण

कर्जत तालुक्यातून पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत 41 गावांनी भाग घेतला आहे. यामध्ये तालुक्यातील मिरजगाव महसुली हद्दीतील गोंदर्डी गावाने पहिल्या टप्यातील कामे पूर्ण करून 15 गुण मिळवून आता तुफान आलय म्हणत प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यानंतर या गावात राष्ट्रीय जैन संघटनेच्या वतीने 200 तास काम करण्यासाठी पोकलंड मशीन देण्यात आले आहे. याकामाचे उद्घाटन कर्जतचे तहसीलदार किरण सावंत यांनी केले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, मिरजगावचे सरपंच नितीन खेतमाळस, जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष अभय बोरा, अमृत लिंगडे, पप्पू कोठारी, नितीन देशमुख, पाणी फाऊंडेशनचे अमोल लांडगे, ग्रामविकास अधिकारी शरद कवडे, पोपटलाल बोरा, बबन दळवी, राजेंद्र गोरे, अर्चना गोरे, मीना फरताडे, कविता म्हस्के, आशिष बोरा, नितीन बनकर, विजय पवार, जमशेद शेख, जयदीप जगताप, बबन म्हस्के, सलीम आतार, कुमार नहार, प्रशांत सोनवणे, संजय घोडके, विशाल म्हस्के, प्रियंका बनकर, उद्धव फरताडे, वर्षा म्हस्के, कविता म्हस्के, समन्वयक शरद थोरात, जयदीप जगताप यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मिरजगाव हद्दीतील महसुली गोंदर्डी गावाने यापूर्वी परिसरातील जमिनीचे माती परीक्षण केले आहे. तसेच गावातील सर्व घरांसाठी श्रमदानातून शेषखड्डे बनविले आहेत. रोप वाटिकेच्या माध्यमातून अडीच हजार रोपे बनविण्यात आलेले आहेत. संपूर्ण गोंदर्डी परिसरात आगपेटी मुक्त करण्यात आलेला आहे. जुन्या रचनांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून, 7 लूज बोल्डर स्ट्रक्चर, श्रमदानातून कमपार्ट बंधारे तयार करण्यात आलेले आहेत. तर समतल 4 श्रमदानातून करण्यात आलेले आहेत. या गावांतील प्राथमिक पातळीवरील सर्व कामे पूर्ण करण्यात आले असुन या गावाने सर्व गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. यापुढे गोंदर्डी परिसरातील ओढे नाले खोलीकरणाचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी जैन फाऊंडेशनकडून जेसीबी व पोकलंड मशीन देण्यात आले आहेत. त्यापैकी पहिले मशीन बोंदर्डी गावात देण्यात आलेले आहे. यामाध्यमातून या परिसरातील ओढे नाले खोलीकरणाचे काम सुरु करण्यात आलेले आहे.