Breaking News

कुकडी कालवा सल्लागार समिती बैठक


कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक काल राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांचे अध्यक्षतेखाली व पुण्याचे पालकमंत्री ना. गिरीश बापट, अहमदनगरचे पालकमंत्री व जलसंधारण मंत्री ना. राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मा. विधानसभा अध्यक्ष आमदार मा. दिलीप वळसे पाटील यांचे उपस्थितीत मंत्रालय, मुंबई येथे पार पडली. सदर बैठकीमध्ये कुकडी प्रकल्पातून येडगावमध्ये पाणी सोडून येडगाव मध्ये अगोदर फिडींग केले जाणार असुन, तेथे उपयुक्त साठा झाल्या नंतर शेतीसाठी लगेच आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर आवर्तनामधून श्रीगोंदा तालुक्यातील मागील आवर्तनातून वंचित राहिलेल्या पूर्व भागातील लाभधारक शेतकर्‍यांना प्रथम प्राधान्याने पाणी देण्याचा निर्णय झाला. विसापूरमध्ये ही पाणी सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल जगताप यांनी दिली.