Breaking News

सुलभ व्यापार अँपचे उदघाटन उत्साहात


कोपरगाव / प्रतिनिधी - ई-कॉमर्सच्या जगात कृषी व्यावसायिक आणि ग्रामीण भागातील व्यापारी यांना व्यवसायाचे नियंत्रण योग्यरित्या करता यावे, यासाठी बनविण्यात आलेल्या ‘सुलभ व्यापार अॅप’चे उदघाटन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पार पडले. शिर्डी येथे आयोजित कार्यक्रमात ‘माफदा’ (महाराष्ट्र राज्य फर्टीलायजर सीड्स अँड पेस्टीसाईड्स असोशिएशन, पुणे) आयोजित कृषी व्यावसायिकांच्या पहिल्या संमेलनात सुलभ व्यापार अॅप लाइव्ह करण्यात आले. कार्यक्रमास माफदाचे अध्यक्ष प्रकाश कवडे यांनी माहिती दिली, ‘माफदा’ आणि ‘रिफोर्मिस्ट इंडिया आयटी सोल्युशन्स प्रा. ली. पुणे ’ च्या संयुक्त प्रयत्नाने १ वर्ष काम करत या अॅप ची निर्मिती केली आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोर मराठीसह हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे. सुलभ व्यापारमुळे आता कृषी व ग्रामीण व्यावसायिकांना खरेदी, विक्री, जमा, बाकी चे तपशील रिपोर्ट्स पाहता येतील तसेच प्रत्येक व्यवहाराचा मोबाईल संदेश ग्राहकास प्राप्त होणार आहे. दरम्यान, या उदघाटन सोहळ्यास आ. स्नेहलता कोल्हे, अॅग्रो इनपुट डीलर्स असोसीएशन (दिल्ली)चे अध्यक्ष मनमोहन कलंत्री, रिफॉर्मीस्टचे संचालक अनिकेत पानगव्हाणे आदींसह देशभरातील ३ हजार हून अधिक व्यावसायिकांनी उपस्थिती दर्शविली.