Breaking News

पलूस- कडेगाव विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

सांगली, दि. 29, एप्रिल - भारत निवडणूक आयोगाने 285 - पलूस - कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम 26 एप्रिल रोजी जाहीर केला आहे. या पोटनिवडणुक ीसाठी 28 मे रोजी मतदान तर 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान या पोटनिवडणुकीची संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, ही माहिती प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली.

285 - पलूस - कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा पोटनिवडणूकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे - निवडणुकीची अधिसूचना जाहीर करण्याची तारीख गुरूवार 3 मे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस गुरूवार, 10 मे रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी शुक्रवार 11 मे नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा शेवटचा दिवस सोमवार, 14 मे रोजी मतदानाची तारीख सोमवार 28 मे रोजी मतमोजणीची तारीख गुरूवार 31 मे रोजा निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख शनिवार 2 जून रोजी.
285 - पलूस - कडेगाव विधानसभा मतदारसंघात 10 जानेवारी रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदारयारीनुसार पुरूष मतदार 1 लाख 35 हजार 663, स्त्री मतदार 1 लाख 29 हजार 635, अन्य मतदार 3, असे एकूण 2 लाख 65 हजार 301 मतदार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून 2 लाख 63 हजार 704 मतदान ओळखपत्र प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या मतदारसंघात 282 मतदान केंद्रे असून सर्व मतदान केंद्रे सुस्थितीत आहेत. निवडणुकीसाठी 10 टक्के राखीवसह आवश्यक कर्मचारी संख्या तसेच आवश्यक वाहनांचे अधिगृहण पुरेशा प्रमाणात क रण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कडेगावचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख आहेत तर कडेगावच्या तहसिलदार अर्चना शेटे आणि पलूसचे तहसिलदार राजेंद्र पोळ हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. 
दरम्यान या निवडणुकीची संपूर्ण जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेचे सर्व संबंधितांनी काटेकोर पालन करून शांततामय, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात ही पोटनिवडणुकीची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी केले आहे.