Breaking News

नांदुरशिकारी शाळेत विद्यार्थ्यांना निरोप


भाविनिमगाव - नेवासा तालुक्यातील नांदूरशिकारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्साहात निरोप देऊन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी निरोप समारंभ निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रखमाजी लिपने होते . 

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे नेवासा तालुका उपाध्यक्ष विलास लिपने, सरपंच गोरक्षनाथ राजमाने , उपसरपंच गोरक्षनाथ लिपने , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्‍वनाथ लिपने उपस्थित होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय घुले , सुनिता पाचेगावकर , पंढरीनाथ काशिद , लक्ष्मण गायकवाड , नामदेव धायतडक, अंबादास बोरुडे , आशा माने, गोपाळ राऊत , अंकुश नवले , रवींद्र पवार , सचिन लिपने , सर्जेराव कासारे संजय खलाटे आदींसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा गवारे हिने केले तर आभार सोनाली पवार हिने मानले.