Breaking News

पंचायत समितीत वैयक्तिक लाभ धनादेश वाटप


पाथर्डी : पंचायत समितीच्या वतीने अपंग आजारी आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांना वैयक्तिक लाभ योजनेचे एकत्रित 19 लाख रु. धनादेशाचे वाटप आ.मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सभापती चंद्रकला खेडकर , उपसभापती विष्णुपंत अकोलकर, जि.प.सदस्य पुरुषोत्तम आठरे गट विकास अधिकारी जगदीश पालवे , नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, नगरसेवक प्रवीण राजगुरू, मा.जि.प.सदस्य सोमनाथ खेडकर, प.स सदस्या मनीषा वायकर, सुभाष केकाण, गोकुळ दौंड, सुनील ओव्हल आदि उपस्थित होते.