Breaking News

श्रीरामपूर येथे राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा पंधरवडा अभियानास सुरुवात


श्रीरामपुर ता. प्रतिनिधी - श्रीरामपूर येथील उपपरिवहन कार्यालयात, उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय आणि पोलिस खाते यांच्या संयुक्त विद्यमाने 29 व्या राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा पंधरवडा 2018 चे आयोजन करण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए. ए. खान, राज्य अधिस्विकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे, श्रीरामपूर वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. वाय. के. शेख, बाळासाहेब आगे, श्रीरामपूर तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष डॉ. गोरख बारहाते, अहमदनगर जिल्हा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल मुथ्था, यांचे शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे, श्रीरामपूर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक ललित पडूळे, पञकार करण नवले, पद्माकर शिंपी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी रस्ता सुरक्षा मार्गदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हा रस्ता सुरक्षा पंधरवडा 23 एप्रिल ते दि 7 मे या पंधरवाड्याच्या कालावधीत कार्यक्षेत्रातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, अशा सातही तालुक्यात राबविला जाणार आहे, रस्ता सुरक्षेविषयी विविध मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वाहन चालक, मालक, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी, तथा सर्व सामान्य नागरिकांनी यात मोठ्या संख्येने भाग घ्यावा असे आरटीओ अधिकार्‍यांकडून अवाहन करण्या आले आहे .यावेळी रस्ता सुरक्षेविषयी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सहायक मोटार वाहन निरीक्षक आयशा हुसेन, जयश्री झिने, समता फाऊंडेशनचे शौकतभाई शेख, संतोष पवार, निलेश परबत, हाजी शेख इसाक मास्टर, प्रताप शिंदे, झेंडे मामा वाहन चालक मालक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक मोटार वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर यांनी केले तर मोटार वाहन निरीक्षक भगोरे यांनी आभार मानले.