Breaking News

पदवीधर मतदार संघाप्रमाणे पञकार मतदार संघ स्थापन करावा


श्रीरामपुर ता. प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यात ज्याप्रमाणे सरकारने पदवीधर मतदार संघ तयार करुन आमदार होतात त्याप्रमाणे भाजप सरकारने पञकार मतदार संघ स्थापन करावा यासाठी लवकरच महाराष्ट्र पञकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविदास बैरागी यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर महाराष्ट्र पञकार संघाचे शिष्टमंडळ मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार आहेत.अशी माहिती महाराष्ट्र पञकार संघाचे अहमदनगर जिल्हाअध्यक्ष दताञय खेमनर यांनी दिली. महाराष्ट्रातील पञकार बांधवाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी व त्यावर आवाज उठविण्यासाठी आता सरकार मध्ये पञकाराचा हक्काचा प्रतिनिधी असावा म्हणून महाराष्ट्र पञकार संघ यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे तसेच अशा प्रकारे पञकार मतदार संघ जर स्थापन झाला तर पञकार हल्ला विरोधी कायदा व पञकार पेन्शन व पञकारांना मानधन त्याचप्रमाणे पञकारांना तात्काळ मुद्रा लोन व व्यवसाय कर्ज राष्ट्रीयकृत बँकेकडुन तात्काळ मिळावे तसेच शासनाने पञकार महामंडळ स्थापन करावे या सर्व गोष्टी सोडविण्यासाठी सरकार कडुन विलंब होत आहे त्या आता आमचा हक्काचा प्रतिनिधी विधानपरिषदेमध्ये पाहीजे त्यामुळे पञकारांचे प्रलंबित प्रश्‍न तात्काळ सुटतील म्हणून सरकारने येत्या अधिवेशानात याला मान्यता द्यावी. यावेळी महाराष्ट्र पञकार संघाचे उतर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामनाथ जहाड, अशोक दुशिंग , राज्य संपर्क प्रमुख किरण शिंदे , छायाचिञ जिल्हाअध्यक्ष किरण शेलार , जिल्हा सचिव राजेंद्र बनकर, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र उंडे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप लोखंडे , अमोल राखपसरे , जिल्हा संघटक दीनबुळे , जिल्हा संपर्क प्रमुख साई प्रसाद कुंभकर्ण श्रीरामपुर तालुका अध्यक्ष साईनाथ बनकर , राजेश बोरूडे ,भरत थोरात , भाऊसाहेब मोरे , राहाता तालुका अध्यक्ष अरूण बाबरे आविनाश डोखे, सतिष पानसरे , हेंमत शेजवळ , राहुरी तालुका अध्यक्ष राजेंद्र साळवे आदी उपस्थित राहणार आहेत.