Breaking News

जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी देवढे


आदर्श वडुले जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी देवढे तर उपाध्यक्षपदी भिसे नेवासे ( प्रतिनिधी )- नेवासा तालुक्यातील आदर्श वडुले गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा पालकमेळवा आयोजित केला होता. यावेळी शाळेतील माता-पालक प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान पवार यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिनकर गर्जे यांनी अध्यक्ष पदासाठी ज्ञानेश्‍वर गर्जे उपाध्यक्षपदासाठी महादेव भिसे यांच्या नावाची सूचना मांडली या सूचनेस अण्णासाहेब गर्जे व संगीता गर्जे यांनी अनुमोदन दिले असून अध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर देवढे यांची तर उपाध्यक्षपदी महादेव भिसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या समितीच्या सदस्यपदी अण्णासाहेब गर्जे , मनीषा भागवत , संगीता गर्जे , सविता गर्जे , आशा करंजे , अशोक मोहन गर्जे , शोभा सरोदे , महादेव भिसे, ताई घोडेचोर, विद्यार्थी प्रतिनिधी एकनाथ कनगरे, विद्यार्थिनी प्रतिनिधी राधा गर्जे , शिक्षण तज्ञ दिनकरराव गर्जे, सचिव भाऊसाहेब दहातोंडे , जेष्ठ शिक्षिका सीमा शाहने, स्थानिक प्राधिकरण संजय गर्जे आदींची निवड करण्यात आली. यावेळी बाबासाहेब अतकरे, शिवाजी पवार , अशोक भागवत , भारत भगत, बाबुराव सरोदे , विनायक सरोदे , मार्कस सरोदे , कैलास पवार ,रामदास सरोदे , गणेश शिलेदार ,सरपंच आशाताई गर्जे ,उपसरपंच छबुताई नरोटे आदिंसह माता-पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते