Breaking News

निळवंडे धरणातून आजपासून शेतीसाठी आवर्तन


श्रीरामपूर, निळवंडे व भंडारदरा धरणातून शेतीसाठी उन्हाळा हंगामातील दूसरे आवर्तन आजपासून ( दि. 26) पासून सूरू करण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दैनिक लोकमंथनशी बोलताना दिली. 

निळवंडे धरणातून आज सायंकाळी सहा वाजता 1500 क्यूसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. हे आवर्तन साधारण 25 ते 28 दिवस सूरू राहिल. या आवर्तनात साधारण 3500 द.ल.घ.फू. पाण्याचा वापर होईल. दिनांक 25 एप्रिल रोजी भंडारदरा धरणात 5212 द.ल.घ.फू. व निळवंडे धरणात 3048 द.ल.घ.फू.असा एकूण 8260 द.ल.घ.फू. पाणीसाठा शिल्लक आहे. आत्तापर्यंत दोन्ही धरणातून खरीप हंगामात एक, रब्बी हंगामात दोन, व ऊन्हाळ हंगामात एक व या आवर्तनास जोडून प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी एक अशी एकूण पाच आवर्तने देण्यात आली आहेत. मागील आवर्तनात सिंचनासाठी 3400 द.ल.घ.फु.व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी 2000 द.ल.घ.फू. असा एकूण 5400 द.ल.घ.फू. पाणीवापर झाला. हे आवर्तन 38 दिवस सूरू होते. या आवर्तनानंतर जून महिन्यात उन्हाळा हंगामातील तिसरे सिंचनाचे आवर्तन देण्यात येणार आहे.