Breaking News

कृषी महाविद्यालय सोनईत राबविले स्वच्छ भारत अभियान


सोनई, मुळा एज्युकेशनच्या कृषी महाविद्यालय सोनईने प्राचार्य डॉ. हरी मोरे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. संदीप तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई बस स्थानक, कौतुकी नदीपात्र परिसर, म्हसोबा मंदिर परिसरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी भारत स्वच्छ अभियान राबविले. याप्रसंगी सोनई बस स्थानकाचे प्रमुख देठे , विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. संदीप तांबे, भगवान गांडूळे, रामदास शिंदे, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे जगन्नाथ औटी, प्रविण बेल्हेकर, जयराम आगळे आदि मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.