Breaking News

अखंड हरिनाम सप्ताह हा विचार व भक्तीला बळकटी देणारा - भास्करगिरी महाराज


नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची बुधवारी दि.25 एप्रिल रोजी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून काल्याच्या किर्तनाने हरिनामाच्या गजरात उत्साहात सांगता करण्यात आली. विचार व भक्तीला बळकटी देण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह असल्याने अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सर्वांनी योगदान देऊन अध्यात्मिक वैभव वाढण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले. यावेळी बोलतांना गुरुवर्य भास्करगिरी महाराज पुढे म्हणाले की मनुष्य जीवनाचे भले होण्यासाठी संत संगती महत्वाची आहे, सत्संगातून जीवनाला दिशा मिळते,ज्याने जन्माला घातले अशा भगवंताचे चिंतन शेवटच्या श्‍वासापर्यंत करा, गोमातेचे रक्षण करा,आई वडिलांची सेवा करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनात त्यांनी भगवान परमात्म्याच्या बाललीलांचे वर्णन केले. 

यावेळी अगस्ती मंदिराचे प्रमुख मच्छींद्र बाबा पठाडे, जेष्ठ सेवेकरी गोविंदराव शेळके, संत सेवेकरी नवनाथ पठाडे, सरपंच राजेंद्र गोलांडे, उपसरपंच गोपीचंद पल्हारे, संत सेवक बदामराव पठाडे, राजू गारुळे, सीताराम जाधव, प्रदीप पठाडे, बाळासाहेब पठाडे, दिनेश मुखेकर,आदिनाथ जाधव, दादाभाऊ अनुभुले, सचिन शेळके, बाळू महाराज कानडे, गायनाचार्य बाबासाहेब सातपुते, विजय महाराज पवार, आदिनाथ जाधव, रमेश पठाडे, ग्रामसेवक शरद सानप, विणेकरी पांडुरंग महाराज हारदे, गोरक्षनाथ महाराज जाधव, गंगाधर पल्हारे, बाबासाहेब खोबरे, काशिनाथ दुशिंग,नामदेव राव अनभुले,आण्णासाहेब शेलार,बाबासाहेब शिरकुले, मृदुंगाचार्य ऋषीकेश फटांगरे, पंढरीनाथ पिंपळे, रामकीसन जाधव यांच्या सह सप्ताह कमिटीचे सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्ताह कमिटीचे सदस्य नवनाथ पठाडे यांनी आभार मानले.अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी ढोलताशांच्या गजरात गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली या शोभयात्रेप्रसंगी सजविलेल्या रथाच्या पुढे डोक्यावर कलश घेतलेल्या बालिका बालके झेंडेकरी, महिला भाीविक मोठया संख्येने सहभागी झाले होते.