Breaking News

व्यंकटेश पतसंस्था : अपहार प्रकरणी आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी


सोनई येथील व्यंकेटश ग्रामीण पथसंस्थेतील 2 कोटी रुपये अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने श्यामसुंदर खामकर, गणेश गोरे,गाणेश तांदळे यांना अटक करण्यात आली, त्यात त्यांना 23 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती, ती संपल्यानंतर आरोपींना नेवासा नाययलायत हजर करण्यात आले तेव्हा न्यायालयाने 14 दिवसाची म्हणजे 7 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये ठेवीदार याचे कोट्यवधी रुपये आडकण्यात कारणीभूत दोषी असल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद केले आहे, अनेक वर्षांपासून या संस्थेने ठेवीदार यांचा विश्‍वास संपादन केला होता. मात्र वेळेत ठेवीदारांचे पैसे न मिळाल्याने आतील करारनामे उघडकीस आले. आरोपींनी ठेवीदारांच्या पैशातून अमाप संपत्ती मिळवून स्वतःचा फायदा केला व संस्था व ठेवीदारांना अडचणीत आणले आणि शेकडो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकवून बसले. त्यामुळे अनेकांचे विवाह, घर, बांधकाम, शिक्षण, आजारपण ,उसनवारी देने आशा अनेकांची स्वप्न अपुर्ण राहिली आहे. या आरोपींना एम. पी. आय. डी. ( ठेवीदार हितसंबंध सुरक्षा 1999 अधिनियम कायदा ) अंतर्गत कलमांचा समावेश लवकरच करण्यात येणारअसल्याची माहिती पुढे आली आहे.