Breaking News

हरिभाऊ तुवर यांच्या लढ्याला यश

श्रीरामपुर ता. प्रतिनिधी - मुळा प्रवराचे पिडीत कर्मचारी हरिभाऊ तुवर यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे मुळा -प्रवरा पुनर्जिवन समितीला तिसर्‍यांदा मुदतवाढ मिळाली. तुवर हे सन 2013 पासुन आंदोलने, उपोषण करत आहे . त्यांनी आतापर्यत 84 वेळा उपोषणे केली व 240 वेळा मुळा प्रवरा संदर्भात अनेक मंञी, आमदार व मंञालयात मुळा प्रवरा विद्युत संस्थेच्या कामगारासाठी लढा दिला. त्यावरती शासनाने मुळा प्रवरा कर्मचारी यांचे देणे देखील दिले त्यावरती तुवर थांबले नाही तर मुळा प्रवरा संस्था संदर्भात पुनर्जिवन समिती हि शासनाने,दि 1मार्च 2016 गठित केली पंरतु शासनाने सन 2016 ते 2018 या काळात समितीची बैठक बोलवण्यात आलील नाही त्या मुळे मुळा प्रवरा कर्मचारी हरिभाऊ तुवर यांनी 11 एप्रिल 2018रोजी मंञालय समोर आझाद मैदान येथे आत्मदहन करणार आहे असा इशारा दिला होता. पंरतु आझाद मैदान पोलिस यांनी तुवर, यांना ताब्यात घेतले. त्यानंतर तुवर यांनी 11 एप्रिल 2018 रोजी आझाद मैदान येथे उपोषण केले त्यावरती दुपारी तुवर यांनी उपोषण सोडले व मंञालयात गेले असता उपसचिव महाराष्ट्र शासन प्रशांत बडगेरी यांनी अशी माहिती दिली की तुम्ही आतापर्यत केलल्या उपोषण व आत्मदहनाच्या इशारा मुळे या समितीची बैठक बोलवण्यात आली व समितीला अहवाल देण्यास मुदत वाढ घेण्यात आली तुवर यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्या मुळे शासनाला ही बैठक बोलव्यात आली आहे.