Breaking News

भारिप बहुजन महासंघाच्या वतीने संजय सुखधान यांना समाजभूषण पुरस्कार


नेवासा (प्रतिनिधी) - श्रीरामपूर येथील भारिप बहुजन महासंघाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार नेवासा येथील घटनापती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष संजय सुखधान यांना श्रीरामपूर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. नेवासा शहरात विविध उपक्रम सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन राबविल्याबद्दल संजय सुखधान यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भारिप बहुजन महासंघाच्या वतीने समाजभूषण पुरस्कार भारिप बहुजन संघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अमित भाऊ भुईगळ यांच्या हस्ते सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.याप्रसंगी श्रीरामपूर भारिप तालुका अध्यक्ष किरण साळवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय सुखधान यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे