आ. थोरातांकडून ‘त्या’ कुटुंबियांचे सांत्वन
मालदाड शिवारातील कडाळे यांच्या अश्विनी या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये तिचा मृत्यु झाला. त्यामुळे आ. थोरात यांनी आज {दि. १} कडाळे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी रावसाहेब नवले, साहेबराव गडाख, विलास नवले, अजय नवले, भाऊसाहेब नवले, मच्छिंद्र नवले, भिमराज नवले, गोरक्ष नवले, बाळासाहेब नवले, उत्तम नवले, मधुकर नवले, बाबासाहेब नवले आदी उपस्थित होते.
यावेळी आ. थोरात म्हणाले की, बिबट्याचे मानवावर वाढते हल्ले ही चिंताजनक बाब आहे. वाढते हल्ल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. यामुळे वनविभागाने अशा नरभक्षक बिबट्यांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावून याबाबत तातडीने उपाय योजना करुन नागरिकांना दिलासा द्यावा. मयत बालकाच्या कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना वनअधिकार्यांना केल्या. याप्रसंगी विविध ठिकाणच्या नागरिकांच्या समस्या समजून घेत कडाळे कुटंबियांचे सात्वंन केले. यावेळी गावातील नागरीक, युवक, मोठ्या संख्यने उपस्थित होते.
