साईभक्तांसाठी जादा रेल्वे सुरु करा रेल्वेमंत्री गोयल याना साकडे
शिर्डी येथे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. त्याप्रसंगी राहाता नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा डॉ. के. वाय. गाडेकर यांनी त्यांना सत्कार केला. यावेळी गाडेकर यांनी निवेदन दिले. यात म्हटले आहे, की शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी लाखो साईभक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. या ठिकाणी रेल्वे सुविधा उपलब्ध आहे. परंतू ती पुरेशी नाही. मुंबईकडून येणाया साईभक्तांना पुणे किंवा मनमाडमार्गे यावे लागते. त्यामुळे भक्तांना मोठा त्रास सहन करावा लागतो तसेच यासाठी खूप वेळही लागतो. यासाठी शिर्डी, नाशिक किंवा घोटी यामार्गे नवीन रेल्वेमार्ग सुरु करावा. यामुळे येथील परिसरातील शेतकयांना आपला भाजी माल व येथे असणाया पेरु, द्राक्षे व डाळिंब या फळांची विक्री मुंबई येथे करण्यासाठी सोपे होईल. त्यामुळे भक्तांबरोबरच येथील शेतकयांसाठी ही चांगल्या पध्दतीची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. यावेळी डॉ. गाडेकर यांच्या समवेत भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
