Breaking News

जिल्ह्यात सर्वाधिक रमाई आवास योजनेचा कर्जतला लाभ : सभापती शेळके



अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त रमाई आवास घरकुल योजनेत कर्जत तालुक्यातील घरकुलांना मंजुरी मिळाल्याची माहिती पं. स. सभापती पुष्पा शेळके व उप. सभापती प्रशांत बुध्दिवंत यांनी दिली.जिल्ह्यात रमाई आवास योजेनेत 950 घरकुलांना मंजुरी मिळाली, प्रधानमंत्री आवास योजनेंतंर्गत 601, शबरी आवास योजनेतून 8 तर, पारधी आवास घरकुल योजनेतून 9 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.



कर्जत पंचायत समिती सभापती पुष्पाताई शेळके व उप. सभापती प्रशांत बुध्दीवंत याच्या नेतुत्वाखाली यशस्वी नियोजन व कारभार सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब जनतेला अधिक प्रमाणात घरकुल योजनेचा फायदा होत आहे. सभापती शेळके व उप. सभापती बुध्दिवंत यांना पं. स. सदस्य ज्योती शिंदे, राजेंद्र गुंड, साधना कदम, अश्‍विनी कानगुडे, हेमंत मोरे, बाबासाहेब गांगर्डे यांनी साथ दिली. तर जि. प. सदस्य सुनिता खेडकर, कांतीलाल घोडके, गुलाब तनपुरे व समाजकल्याण सभापती उमेश परहर यांनी मोलाची मदत करून मंजूरी मिळवून दिली. 

सभापती पुष्पाताई शेळके, उप सभापती प्रशांत बुध्दिवंत व गट विकास अधिकारी दताञय दराडे यांनी अवाहन केले आहे की, शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहुन लाभार्थ्यांनी घरकुल व शौचालय बांधकामासह विहीत केलेल्या मुदतीत पूर्ण करणयाची दक्षता घेवून व वेळोवेळी ग्रामसेवक व शाखा अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली दर्जेदार कामे करून विहीत नमुन्यात कागदपत्रांची पुर्तता करून पंचायत समितीकडे सादर करावीत व त्याच बरोबर बँकेच्या खाते पुस्तकाची झेरॉक्स प्रतही जमा करावी.