Breaking News

विरोधकांच्या पोटात का दुखतय हेच कळत नाही : डॉ. सुजय विखे


कर्जत, मी गोर गरीबांचे आरोग्य सुधारण्यासाठी काम करतोय पण यामुळे विरोधकांच्या पोटात का दुखतय हेच कळत नाही असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्जत तालुक्यातील शिंदे येथे बोलताना केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते बापूसाहेब गुंड हे होते. जनसेवा फौंडेशन व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन यांच्या वतीने आज कर्जत तालुक्यातील शिंदे येथे मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी बोलताना ते म्हणाले की, मोठी माणसं कोठेही उपचार घेतात, मात्र ग्रामीण भागातील गोर गरीब शेतकरी यांना आर्थिक परिस्थिती व वेळ यामुळे योग्य उपचार मिळत नाहीत. अशा गरजुंना उपचार मिळावेत म्हणून ही आरोग्य शिबीरे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. मात्र या शिबिराचा धसका विरोधकांनी घेतलाय. त्यांच्या पोटात दुखू लागलय ते म्हणतात आताच त्यांनी का हे सुरू केलं. ग्रामीण भागातील गरजूंचे आरोग्य सुधारने हाच हेतू यामागे आहे असे त्यांनी स्पष्ट केले. ही समाजसेवा आम्ही पदर करत आहोत, त्यांच्या सारखे ठेकेदारावर जबाबदारी आम्ही टाकत नाही. वेळ आल्यावर यावर बोलेल असे त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते बापुसाहेब गुंड यांचे भाषण झाले. 

या कार्यक्रमाला जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आंबादास पिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण घुले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लहु वतारे, अंकुश यादव, कुळधरणचे सरपंच अशोक जगताप, कोपर्डीचे सरपंच सुर्यभान सुद्रिक, शिंदे गावच्या सरपंच मनिषा घालमे, उपसरपंच अनिता घालमे, रुई गव्हाचे सरपंच राजेंद्र पवार, तात्यासाहेब घालमे, मधुकर घालमे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लालासाहेब सुद्रिक, कुळधरणचे पोलीस पाटील समीर जगताप, डॉ. विजय हजारे, कर्जतचे नगरसेवक संदीप बरबडे, आदी मोठया संख्येने उपस्थित होते. ( कर्जत तालुक्यातील शिंदे येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचा दोन हजार रूग्णांनी लाभ घेतला.