Breaking News

जागतिक आरोग्य दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर


जामखेड़, जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त श्री ऑल इंडिया श्‍वेतांबर स्थानकवाशी जैन कॉन्फरन्स दिल्ली व साहेबराव वारे ग्रामविकास प्रतिष्ठाण पांगरी तसेच ओम हॉस्पिटल जामखेड़ यांच्या सयुक्त विद्यमाने शासकीय, नियमशासकीय, पत्रकार, तसेच सर्व सामान्य गोरगरीब लोकांच्या आरोग्य तपासणीसाठी मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबीर ठेवण्यात आले आहे. अशी माहिती जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांनी दिली. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री राम शिंदे उपस्थित राहणार आहेत. तसेच अविनाश चोरडिया अध्यक्ष जैन कॉन्फरन्स नवी दिल्ली यांच्या शुभहस्ते, प्रमुख उपस्थिती शशिकांत कर्नावट राष्ट्रीय युवा अध्यक्ष जैन कॉन्फरन्स, विजय बंब प्रसिद्ध उद्योगपती बीड, डॉ. सुधाकर शिंदे म.न.पा. आयुक्त पनवेल, वैद्यकीय व अधीक्षक डॉ. युवराज खराडे, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. सुनील बोराडे, जामखेड़चे प्रभारी तहसीलदार विजय भंडारी, प्रभारी पोलिस निरीक्षक नितिन पगार हे उपस्थित राहणार आहे. या शिबिरात हृदय रोग, दमा, किडनी विकार, मधुमेह, संधिवात, रक्त दाब व इतर तपासण्या मोफत होणार आहेत.

या शिबिरात ब्लड शुगर (50 रुपये, ई. सी. जी. 200 रुपये, सी.बी.सी 150 रुपये, लिपिड प्रोफाइल 400 रुपये, थाइरोइड 500 रुपये अशी एकून 1300 रूपयांच्या तपासन्या मोफत होणार आहेत. या शिबिरात भाग घेणार्‍या रुग्णांना पुढील उपचार व ऑपरेशन सवलतीच्या दरात करण्यात येणार असल्याचे ओम होस्पिटलचे संचालक संदीप ठोंबरे यांनी सांगितले. या शिबिरात तज्ज्ञ डॉ. शार्दुल कुलकर्णी, चऊ मेडिसिन हृदय रोग व मधुमेह तज्ञ डॉ. रोहन टोमके चऊ मेडिसीन हृदय रोग व मधुमेह तज्ज्ञ डॉ. मधुरा कुलकर्णी चइइड. ऊॠज स्त्रीरोग तज्ञ, डॉ. कपिल घोरपड़े चइइड. ऊछइ. जीींहे हाडाचे तज्ञ डॉ. सचिन टेकाडे चइइड. चड जनरल सर्जन हे सर्व तज्ज्ञ डॉक्टर मोफत तपासणी करणार आहेत. या शिबिरात गरजूंनी सहभाग करावा आणि अधिक माहिती तसेच नाव नोंदणीसाठी संपर्क संजय कोठारी मो.9420800981 यांचेशी संपर्क साधावा.