Breaking News

श्रीरामपूर येथील श्रीमद् भागवत कथेचे ध्वजारोहन

श्रीरामपूर /शहर प्रतिनिधी /- श्रीमद् भागवत कथा ही 335 आध्याय 18 हजार श्‍लोक तर 5 लाख 60 हजार शब्दाची आहे. ही कथा वर्षेभर नव्हे तर 7 जन्म ऐकली तरी पुर्णे होऊ शकत नाही अशी ही कथा आपण सात दिवसात पुर्णे करणार असुन यांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे प्रतिप्रादन महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी थत्ते मैदानावर ध्वजारोेहन कार्यक्रमाप्रसंगी केले. सदगुरु योगिराज गंगागिरी महाराज भक्त परिवार व तुळजा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सराला बेटाचे मठाधिपती महंत गुरुवर्य भागवताचार्य रामगिरीजी महाराज यांच्या अधिपत्याखाली दि. 2 मे ते 9 मे दरम्यान होणार्‍या श्रीमद् भागवत कथेच्या ध्वजारोहनश्रीमद् भागवत कथेच्याा ध्वजारोहन महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. ध्वजारोहनचे पुरोहिते माजी नगरसेवक नारायण डावखर व त्यांच्या पत्नी माजी नगरध्यक्षा इंदुताई डावखर यांच्या हस्ते करण्यात आले. तर ध्वजारोहन महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते विधीवत पुजेने पार पाडले.यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, बाजार समितीचे सभापती सचिन गुजर, मुळा प्रवराचे उपाध्यक्ष जी.के. बकाल , माजी सभापती नाना पवार, पंचायत समितीच्या सदस्या वंदना मुरकुटे, सुधीर नवले, नगरसेवक दिलीप नांगरे, मनोज लबडे, नगरसेविका आशा रासकर , मिरा रोटे, भारती परदेशी , माजी नगरसेवक संजय छल्लारे, पुरुषत्तोम मुळे, दत्तात्रय धालपे, स्वाती छल्लारे, सुनंदा जगधने, यादवराव लबडे, निलेश नागले, धुकर महाराज , जगताप महाराज,आण्णासाहेब डावखर, राजेद्र सोनवणे,ज्ञानेश्‍वर मुरकुटे, आदिसह नागरिक उपस्थित होते. यावळी प्रास्ताविकात बाजार समितीचे सभापती सचिन गुजर यांनी या कथेची नियोजनाची तयारी अंतीम टप्यात आली असल्याचे सांगितले. यावेळी गुजर यांनी अपघातात निधन झालेले उद्योजक अलतमश पटेल यांचे वडिल व नगरसेविका अक्सा पटेल यांचे सांसरे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. सराला बेटाचे मठाधिपती महंत गुरुवर्य भागवताचार्य रामगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून दि. 2 मे ते 9 मे 2018 रोजी श्रीमद् भागवत कथा श्रवणाचे भाग्य श्रीरामपूरवासियांना लाभणार आहे. दि. 2 मे ते 9 मे 2018 दरम्यान सायंकाळी 6.30 ते रात्री 9.30 पर्यंत थत्ते मैदान, श्रीरामपूर येथे श्रीमद् भागवत कथेचा सोहळा रंगणार आहे. या भव्यदिव्य श्रीमद् भागवत कथेची सुरुवात भव्य शोभायात्रेने होणार असून बुधवार दि. 2 मे रोजी दुपारी 4 वाजता हनुमान मंदिर, रेल्वे स्टेशनजवळ, श्रीरामपूर येथून निघणार आहे.असे अजय धाकतोडे यांनी सांगितले.
यावेळी स्वागत उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. तर आभार मधु महाराज यांनी मानले. या धार्मिक कार्यात समस्त भाविकांनी सहकुटुंब सहभागी होवून या श्रीमद् भागवत कथेकरिता उपस्थित रहाण्याचे आवाहन सदगुरु योगिराज गंगागिरी महाराज भक्त परिवार व तुळज़ा फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.