Breaking News

मंदिराचा चांदीचा दरवाजा, देवीच्या अलंकारांना पॉलिश

निघोज । पारनेर व शिरूर तालुक्यातील देवदेवतांचे सोन्या-चांदीचे मुखवटे, दरवाजे व दागिने कमी दरात तयार करून देण्याचे काम येथील सुनिती ज्वेलर्सचे चालक गणेश कटारिया यांनी केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी हा सेवाभावी उपक्रम सुरू केला असून अनेक देवस्थानचे पदाधिकारी व विश्‍वस्तांनी मंडळांनी त्यांना हे काम करण्याची संधी दिली आहे. मळगंगा देवीची यात्रा 8 पासून सुरू होत आहे. यानिमित्त कटारिया व त्यांच्या सहकार्‍यांनी मंदिराचा चांदीचा दरवाजा व देवीचे सोन्या-चांदीचे अलंकार मोफत पॉलिश करून दिले आहेत. सामाजिक व धार्मिक कामातून मला व परिवाराला आनंद मिळतो, असे कटारिया यांनी सांगितले.