Breaking News

देव व मुळा नदीवरील संगमावर साठवण बंधारा तयार करणार


प्रतिनिधी । राहुरी शहर - राहुरीच्या देव व मुळा नदीवरील संगमावर खास बाब म्हणून कोल्हापूर पद्धतीच्या साठवण बंधार्‍याचे काम पूर्ण केले जाईल, असे जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. मुळा नदीकाठच्या शेतीला संजीवनी देणार्‍या देव नदीवरील साठवण बंधार्‍याचे काम करण्याची मागणी शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केली होती. या मागणीची दखल घेत शिवतारे यांनी लघू पाटबंधारे, तसेच मुळा पाटबंधारे अधिकारी व लाभधारक शेतकर्‍यांसमवेत नियोजित बंधार्‍याच्या जागेची पाहणी केली. येत्या 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय थोरात यांना दिले. 80 दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असणार्‍या या साठवण बंधार्‍यामुळे देसवंडी, राहुरी खुर्द, तमनर आखाडा, तांदुळवाडी, राहुरी, कोंढवड, शिलेगाव, राहुरी, वाघाचा आखाडा, स्टेशन या तीन किलोमीटर अंतराच्या परिसरातील शेतीला पाण्याचा लाभ होणार आहे. यावेळी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता व शेतकरी उपस्थित होते.