Breaking News

बेपत्ता भारतीय शीख तरुण पाकिस्तानात सापडला

पाकिस्तानमध्ये बैसाखी उत्सवादरम्यान बेपत्ता झालेला २४वर्षीय भारतीय शीख तरुण सापडला अाहे. अमरजित सिंह नाव असलेला हा तरुण अमृतसरचा रहिवासी अाहे. ताे लाहाेरपासून सुमारे ५० किमी अंतरावरील शेखूपुरा येथे अापल्या फेसबुक मित्राच्या घरी अाढळून अाला. 

याबाबतची माहिती इवेक्वी ट्रस्ट प्राॅपर्टी बाेर्डाचे (ईटीपीबी) प्रवक्ते अामिर हाश्मी यांनी दिली. अमरजित हा गत १२ एप्रिल राेजी बैसाखी सणासाठी १,७०० शीख भाविकांच्या जथ्थ्यासह पाकमध्ये गेला हाेता. मात्र, परतताना ताे बेपत्ता झाला. या सर्वांना २१ एप्रिलपर्यंतचा व्हिसा मिळालेला हाेता. यादरम्यान अमरजित हा शेखूपुरा येथील फेसबुक मित्र रज्जाकला भेटण्यासाठी गेला हाेता. सुदैवाने रज्जाकच्या कुटुंबाने याबाबतची माहिती बाेर्डाला दिली. त्यानुसार साेमवारी ताे व रज्जाक हे दाेघे ईटीपीबीच्या कार्यालयात गेले व तेथे अमरजितने अापण बेपत्ता झालाे नसल्याची माहिती दिली. त्याला मंगळवारी भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात अाले.