Breaking News

गृहमंत्र्यांना आवरेना कारभार्‍यांच्या खुर्चीचा मोह..!

गेल्या महिन्यात महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील एका दादा मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या एका कार्यकारी च्या कार्यालयात जाऊन त्यांच्या खुर्चीची आस्थेने चौकशी करून त्या खुर्चीवर स्थानापन्न होत कृतार्थ होण्याचा अनुभव घेतला. मंत्र्यांची ज्येष्ठता लक्षात घेता मंत्र्यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांची खुर्ची काही क्षण बसण्यासाठी वापरली तर त्यात वावगे नसावे. पण यातून प्रेरणा घेऊन प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या गृहमंत्रीही असा आगळा वेगळा अनुभव घेण्याची हौस म्हणून आपल्या घरधन्याच्या खुर्चीवर बसण्याची संधी साधतात. एरवी केवळ पदसिध्द आणि कर्तव्यावर असताना मिळणार्‍या शासकीय सोयी सुविधांचा लाभ कुटूंबियांच्या पदरात टाकण्यासाठी शासकीय मंडळी तत्पर असते. त्यातलाच हा एक प्रकार.मंत्रालयाच्या शासकीय मुद्रणालयातील एका उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या दालनातील हे दृश्य. छायाचित्रात दिसत असलेल्या या सन्माननीय ताई या कार्यालयाच्या कुणी अधिकारी नाहीत तर कार्यालयाचे आणि त्यांचेही कारभारी असलेल्या व्यक्तीमत्वाची धर्मपत्नी होण्याचे सौभाग्य लाभले आणि त्यांनही आपल्या पतीराजांच्या खुर्चीची उब घेण्याचा मोह झाला. आले पत्नीच्या मना, पतीराजांचे काही चालेना. शेवटी आपल्या पत्नीची ही हौसही प तीराजांनी पुरवली. आता बोला!