Breaking News

किशोरवयातच जीवनाचे ध्येय निश्चित करावे – डॉ. अंशू मुळे


स्नेहालय पुनर्वसन संकुल आयोजित उन्हाळी छंदवर्गात उपस्थित किशोरवयीन मुलीना, किशोरवयातच जीवनाचे ध्येय निश्चित करावे असे आव्हान डॉ. अंशू मुळे यांनी केले. दरवर्षी स्नेहालय पुनर्वसन संकुलात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उन्हाळी छंदवर्गाचे आयोजन केले जाते. आज या छंदवर्गात पल्स फाउंडेशन डॉ अंशू मुळे यांनी किशोरवयीन मुलींशी संवाद साधला. किशोरवयात मुलांमुलींमध्ये होणारे मानसिक, भावनिक व शारिरीक बदल कसे होतात, या वयात वाढणा-या आकर्षणामुळे अभ्यासावर होणारा दुष्परिणाम तसेच मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी या बद्दल मार्गदर्शन केले. किशोरवयातच जीवनाचे ध्येय ठरविल्यास ते साध्य करण्यात कमी अडथळे निर्माण होतात त्यामुळे किशोरवयातच जीवनाचे ध्येय निश्चित करण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमासाठी संकुलातील ८० किशोरवयीन मुली सहभागी होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलातील बेबीताई केंगार, कविताताई वाकचौरे व रेणुकाताई दहातोंडे यांनी विशेष प्रयत्न केले.