Breaking News

‘प्रवरा’च्या विद्यार्थांची नोकरीसाठी निवड


प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षात शिकत असलेल्या विविध विभागातील ७५ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे नामांकित राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अंतिम निकालापूर्वीच निवड झाली, अशी माहिती प्राचार्य डॉ. यशवंत खर्डे यांनी दिली.
या यशाबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे, ज़िल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, युवा नेते डॉ. सुजय विखे, महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, संचालक डॉ. हरिभाऊ आहेर आदींनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.