Breaking News

स्मार्टग्राम स्पर्धेसाठी मांजरसुंबा गावाची पाहणी

नगर । प्रतिनिधी - जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय स्मार्टग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातून निवड झालेल्या प्रत्येकी एका गावाची अशी एकूण जिल्ह्यातील 14 गावांची पथकाने पाहणी केली. यामधून निवड झालेल्या गावाची स्मार्टग्राम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. आदर्शगाव मांजरसुंबा (ता. नगर) गावाची स्मार्टग्राम स्पर्धेसाठी जि. प. आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे, अतिरिक्त आरोग्याधिकारी दादासाहेब साळुंके, कर्जत पं.स. विस्तार अधिकारी सुजित भोग, डॉ. करण नागपूरकर आदींनी गावातील विविध प्रकल्पांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच जालिंदर कदम, उपसरपंच रंजना कदम, इंद्रभान कदम, तुकाराम वाखुरे, पांडुरंग कदम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.