Breaking News

संयुक्त लष्करी तळावर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला


पुलवामा : तहाब भागात असलेल्या लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त तळावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी हल्ला केला. विशेष म्हणजे ग्रेनेडच्या सहाय्याने हा हल्ला क रण्यात आला आहे. लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त तळावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी युबीजीएलचा (अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर) वापर केला. दहशतवाद्यांनी तळावर साधारणपणे पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास ग्रेनेड हल्ला केला. मात्र ग्रेनेड छावणीच्या कुंपनाजवळ पडून स्फोट झाला. त्यामुळे या हल्ल्यात सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.