Breaking News

छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा नक्षलविरोधी शोध मोहिम सुरू असतांना कारवाई


बिजापूर - तेलंगण राज्याच्या सीमारेषेवर सुरक्षारक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. चकमकीनंतर जवानांनी हाती घेतलेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान 7 नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. चकमकीदरम्यान तीन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये 2 पुरूष आणि 5 महिलांचा समावेश आहे. सुरक्षारक्षकांनी घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला. छत्तीसगड-तेलंगणाच्या सीमेवर ही चकमक घडल्याची माहिती समोर आली आहे. नक्षलवाद्यांसोबत झालेल्या या चकमकीमध्ये तीन जवानदेखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गेल्या आठवडयात गडचिरोली येथे नक्षल विरोधी अभियानादरम्यान पोलिसांनी अभूतपूर्व यश मिळवत 16 नक्षल्यांना कंठस्नान घातल्याचे दिसून आले तरी प्रत्यक्षात त्या चकमकीतील मृतांचा आकडा आता 31 वर पोहोचला आहे. मंगळवारी राबविलेल्या शोधमोहीमेत छत्तीसगड सीमेवरील इंद्रावती नदीत 15 मृतदेह आढळले होते. यासोबत सोमवारी अहेरी तालुक्मयातील नैनर परिसरात झालेल्या चकमकीत सहा नक्षली ठार झाले. त्यामुळे सलग दोन दिवसांत झालेल्या चकमकींमध्ये प्रथमच तब्बल 37 नक्षलवादी मारले गेले. नक्षलविरोधी अभियानात आतापर्यंत पो लिसांना मिळालेले हे सर्वात मोठे यश आहे.