Breaking News

भारिप बहुजन महासंघाचा पदग्रहण सोहळा

श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी / - श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकताच भारिप बहुजन महासंघाचा पदग्रहण सोहळा शहराध्यक्ष दिलीप वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अहमदनगरचे जिल्हा अध्यक्ष शरद खरात, भारिप जिल्हा सचिव प्रवक्ते इस्माईल मौलाना, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव गौतम पगारे, कोपरगाव तालुकाध्यक्ष बाजीराव रनशूर, सुनील वाघमारे, अशोक दिवे, श्रीराम मोरे, आण्णासाहेब झिने, लक्ष्मण मोहन, आहिरे ताई यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा सोहळा पार पडला.


यावेळी किरण साळवे यांची तालुकाध्यक्षपदी तर इंद्रजीत गायकवाड जिल्हाउपाध्यक्षपदी , चरण त्रिभुवन युवा तालुकाध्यक्ष पदी, अशोक बोरगे कामगार संघटना तालुकाध्यक्ष पदी , बापू शिंदे शहर संघटक, शेरखान पठाण शहरसचिव, संतोष त्रिभुवन शहर उपाध्यक्ष, महिला आघाडीच्या निशा भोसले तालुकाध्यक्ष पदी , रंजना सोनवणे तालुका संघटक, कविता झिने तालुका उपाध्यक्ष, कांताबाई लोखंडे शहर सचिव म्हणून निवड करण्यात आली. या कार्यक्रमास शहराध्यक्ष कमलेश कांबळे, महिला आघाडी उपाध्यक्ष ज्योत्स्ना थोरात, दादासाहेब साळवी, नितीन सोनवणे, नानासाहेब सदाशिव, श्रीकांत मोरे, सुरेश हिवराळे, विनोद मोरे, रणजित बनकर, अजय हिवराळे, मोईनुद्दीन शेख, अन्वर शेख, अनिल हिवराळे, किशोर मोरे, प्रशांत मोरे, मंगेश बागुल, नरेश सोनवणे, आकाश मोरे, राज मोरे, अजय शिंदे, किशोर मोरे, नंदू साबळे, वाल्मिक साळवे, गौतम तायेड, आंनद हिवराळे, विकी गंगातिरवे, अर्जुन अमोलिक, प्रशांत पंडित, श्रीकांत बोरुडे, स्वप्नील वाघमारे, सिध्दार्थ गायके, अनंत पडांगळे, अलका केदारी, साधना हिवराळे, सविता साबळे, रेखा मोरे, रुकसाना शेख, सावित्रीबाई बनकर, शोभा बनकर, सुनीता हिवराळे, माया मोरे, सोनी झिने, शोभा गंगावणे, गीता झिने, जया पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.