Breaking News

अपंगांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वावलंबी होणे गरजेचे - परदेशी


अपंगांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वावलंबी होणे अत्यंत गरजेचे आहे. अपंग सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून अपंगांकरिता विविध सामाजिक व पुनर्वसनाचे प्रकल्प राबविले जातात. त्याचा लाभ अपंगांनी घ्यावा, असे प्रतिपादन संस्थेच्या कार्याध्यक्षा ज्योती परदेशी यांनी केले. संघटनेच्या माध्यमातून संगमनेर रोडवर मोफत्त पाणपोई उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी संस्थेचे चेअरमन संजय साळवे, कार्याध्यक्ष चंद्रकांत परदेशी, सचिव वर्षा गायकवाड, किरण वाबळे, हिंद सेवा मंडळ पतसंस्थेचे चेअरमन आधिक जोशी, सुनिल अग्रवाल, बालाजी कुमावत, अजय पाठक, नवनाथ कर्डीले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी झी युवा चॅनेलवर सुपर डान्सर ठरलेला अपंग कलाकार आकाश गोंडे याचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वर्गीय काशिनाथ कानडे यांच्या स्मरणार्थ ही पाणपोई सुरु करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी प्रेरणा पुरस्कार दिला जाणार असल्याचे संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांनी सांगितले. यावेळी आकाश गोंडे म्हणाले की, अपंगांनी आपल्यातील न्यूनगंड सोडून आत्मविश्‍वासाने जिद्दीवर भरारी घेऊ शकतो. 

आपल्यातील उणिवांना आपली शक्ती बनवली पाहिजे. यावेळीसपना बोरुडे व शालन साठे यांना कुबडी देण्यात आली. संस्थेचे सचिव वर्षा गायकवाड यांनी अपंगांनी मतदार नोदणी अभियानात व नवीन मतदार ओळखपत्रामधील बदल आदि विषयांवर सविस्तर मार्गदशन केले. या कार्यक्रमास आसानचे जिल्हाध्यक्ष सुनिल कानडे, उपाध्यक्ष सतिष निकम, तालुकाध्यक्ष इस्माईल शेख, प्रेरणा ठाणगे, यमुना ताठे, सचिव सविता भालेराव, उपाध्यक्षा अलका गाडे, श्‍वेता इंगळे, आदम शेख, रोहिणी गायकवाड, प्रमिला कानडे आदिंनी परिश्रम घेतले.