Breaking News

स्नेहसंमेलनातून विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव : नगराध्यक्षा अनुराधा आदिक


श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी / - विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात, आज शिक्षणामध्ये आंनददाई शिक्षण पध्दतीला महत्वाचे स्थान आहे. स्नेहसंमेलनातून विध्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार घडतो असे प्रतिपादन श्रीरामपूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केले. टिळकनगर येथील कॅथोलिक मराठी शाळेच्या स्नेहसंमेलनच्या कार्यक्रमप्रसंगी आदिक बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रजा जागृती शिक्षण संस्थेचे सचिव रेव्ह.फा. राजेंद्र लोंढे हे होते. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धामध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी शाळेचे संचालक रेव्ह. फा. मायकल वाघमारे, मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक अंबादास ढोकचौळे, नगरसेविका प्रणिती चव्हाण, दीपक चव्हाण, पत्रकार लालमोहमद जहागिरदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम सांस्कृतिक कार्यक्रम सादर केल्याबद्दल पालकवर्गासह ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले. या कार्यक्रमास रांजणखोलचे उपसरपंच बाळासाहेब ढोकचौळे, सुभाष गायकवाड, सिस्टर श्‍वेता , सिस्टर सुजान, संदीप मगर, अशोक लोंढे, किरण खंडागळे, सविता बागुल, राजिया पठाण, निर्मला जाधव, मंगल आवारे, मंदा कुलथे, समीना शेख, वैशाली जगताप, रंजन साळवी, नितीन चित्ते, राजेंद्र मगर, राजेंद्र जगधने, श्रीकांत देशमुख, सहाय्यक धर्मगुरू फा. फ्रान्सिस ओहोळ, उपधर्मगुरू डिकन आंनद बोधक, शिवाजी गायकवाड, सुभाष पारखे, सुनील बोरगे, पदमा गडाख आदींसह पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. निकम यांनी केले तर शामल साळवे, विणा डॉमिनिक यांनी सूत्रसंचालन केले.