Breaking News

श्रीगोंदा-जामखेडच्या फायद्यासाठी डेपोला बगल

वास्तविक पाहता अहमदनगर जिल्हयांत कर्जत तालुका सोडता सर्वच तालुक्यांत एसटी डेपो आहेत. कर्जतला एसटी डेपो नसल्यामुळे संध्याकाळी ६ नंतर कर्जत येथे येण्या-जाण्यासाठी एकही बस उपलब्ध नसते. त्यामुळे कर्जत येथे संध्याकाळनंतर प्रवासाचा संपर्क तुटतो. याशिवाय एसटी डेपो नसल्याने कर्जत तालुक्यातील अनेक खेडेगांवातसुध्दा जाण्यायेण्यासाठी प्रवासाचे साधन नाही. कर्जत तालुक्या शेजारील जामखेड व श्रीगोंदा येथे डेपो आहेत. त्या डेपोच्या फायद्यासाठीच कर्जत येथे डेपो होऊ दिला जात नाही, अशीही जनतेत चर्चा आहे.