‘पेट्रोल’ शंभरी गाठण्याची शक्यता
मुंबई : येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीरियातील तणावाचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डीझेलच्या किंमती येत्या काही दिवसांत गगनाला भिडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीरियातला वाढता तणाव आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलांच्या वाढत्या किंमती पेट्रोलवाढीसाठी कारणीभूत आहेत. येत्या काही दिवसांत खनिज तेलांच्या किंमती 80 डॉलर प्रतिबॅरल होण्याची असून त्याचा परिणाम म्हणून भारतात पेट्रोलच्या किंमती 90 ते 100 रुपये प्रतिलीटरपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज जेपी मॉर्गन या संशोधन करणार्या कंपनीने वर्तविला आहे. गेल्या तीन वर्षातील उच्चांक गाठत कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहे. त्यात आता पेट्रोल जर शंभरीच्या घरात पोहोचल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने रुपयाचे मुल्य कमकुवत होणार असल्याने महागाईत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.