Breaking News

‘हा’ बलात्कार नव्हे ‘सहवास’ : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करून दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. 8 वर्षापासून सुरू असलेल्या संबंधांना बलात्क ार म्हणणे कठिण आहे, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. न्यायमूर्ती एस. ए. बोंडे आणि न्यायमूर्ती एल. नागेश्‍वर राव यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.


याचिकाकर्त्या महिलेने आधीच स्पष्ट केले आहे, की मागील आठ वर्षांपासून ते पत्नी-पत्नीसमान राहत आहेत. आता मात्र आपला साथीदार आपल्यापासून वेगळे होऊ पाहत आहे. या लिव्ह-इन संबंधावर महिलेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, साथीदार पुरुषाने तिच्या कपाळी कुंकू लावले होते, तसेच गळ्यात माळही घातली होती. संबंधित पुरुषाविरुद्ध लावण्यात आलेले आरोप टिकाव धरू शकत नाहीत. ज्याने लग्न करण्याचे वचन दिलेले आहे. आठ वर्षांपासून शारीरिक संबंध असतील आणि याचिकाकर्त्याने स्वत:च हे मान्य केले असेल, की आम्ही पती-पत्नीप्रमाणे राहत होते, तर अशा प्रकरणामध्ये बलात्कार मानणे अवघड होऊन जाते.