रामदासीबाबा निष्ठावंत समर्थ साधक : रामदासी
कोपरगांव: प्रतिनिधी - जगाचे साधक समर्थ रामदास स्वामी निष्ठावंत साधकाची ओळख कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांच्यात होते, असे प्रतिपादन आनंदी नारायण कृपा न्यासचे कार्यकारी विश्वस्त समर्थ भक्त मोहनबुवा रामदासी यांनी केले.
रामदासीबाबा भक्त मंडळ कोकमठाणच्यावतीने हनुमान जन्मोत्सव पारण सांगता कार्यक्रमप्रसंगी शरद थोरात यांच्या हस्ते रामदासीबाबा यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी समर्थभक्त मोहनबुवा रामदासी बोलत होते. याप्रसंगी समर्थ भक्त प्रसादबुवा रामदासी, आनंदी नारायण न्यासाचे विश्वस्त कैलासचंद्र शर्मा, पुजारी रविंद्र जोशी (जांब), ज्ञानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्था (जांब) अध्यक्ष हभप पांडुरंग आनंदे आदींचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी शरद थोरात यांनी प्रास्तविक केले. ते म्हणाले, की रामदासीबाबा यांनी जगाच्या कल्याणासाठी श्रीराम जयराम जय जय राम या मंत्रोपचाराची साधना सर्वांना शिकवत लहान मुलांना अध्यत्मिक संस्काराचे धडे दिले. कलियुगात कलह निर्माण होत आहे. तो कमी करण्यासाठी सर्वांनी अध्यात्म संस्कार ग्रहण करून ते आचरणात आणावेत. कोकमठाणच्या रामदासीबाबांची खरा रामदासी म्हणून जगाला ओळख आहे. रामदासीबाबा भक्त मंडळ त्यांचे कार्य अव्याहतपणे पुढे नेत आहे. ही बाब चांगली आहे. विधीज्ञ महेष भिडे यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले.