Breaking News

थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाची बुधवारी सांगता


संगमनेर प्रतिनिधी - येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सुवर्ण महोत्सवी आणि सन २०१७-१८ या गळीत हंगामाचा सांगता समारंभ येत्या बुधवारी {दि. २५ } सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी विधानपरिषद सदस्य आ. डॉ. सुधीर तांबे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. माधवराव कानवडे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी दिली. या कार्यक्रमास शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष रामनाथ वाघ, शिवाजीराव थोरात, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष सत्यजित तांबे, अजय फटांगरे, निशा कोकणे, शंकरराव खेमनर आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी, कामगार व नागरिक बंधू भगिनींंनी मोठ्या संख्यने कारखाना कार्यस्थळावर उपस्थित रहावे, असे आवाहन कारखान्याच्या संचालक मंडळासह कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.